इस्राइल देशाचे सैन्य अतिशय आधुनिक आहे. जगातल्या प्रगत देशांना टक्कर देऊ शकेल अशा प्रकारची युद्धसामग्री या देशाकडे आहे. वेळोवेळी त्यात भर पडत असते. काही दिवसांपूर्वी इस्राइल पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान इस्राइलने उभ्या केलेल्या आयर्न डोमची जगभर चर्चा झाली होती. आता त्यांनी सैनिकांना चक्क गायब करणारी प्रणाली विकसित केली आहे.
इस्राइलच्या संरक्षण मंत्रालयाने इस्राइलमधील एक कंपनी पोलारीस सॉल्युशन्ससोबत मिळून असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे इस्रायली सैनिक वर्चुअली गायब होऊ शकतात. म्हणजे ते काय कुणाला खरोखर गायब नाही करणार, पण शत्रुसैन्याला सैनिक दिसणार नाही याची पुरेशी सोय करण्यात येणार आहे.


