महिन्याभरापूर्वी क्रिस ऑस्टीन या माणसाला फारसं कोणी ओळखत नव्हतं. पण गेले काही दिवस त्याची सी-लाँग मेडिकल सिस्टीम ही छोटीशी कंपनी चर्चेत आहे. टेक्सासमधल्या या छोट्या उद्योजकाला शोधत चारी दिशांनी लोक येत आहेत. त्याच्या कंपनीचे 'ओव्हरव्हेल्म्ड ' हे हेल्मेटसारखे दिसणारे उपकरण कोवीडच्या पेशंटना श्वासोच्छ्वास करायला मदत करत आहे.
सध्या अमेरिकेत व्हेंटीलेटर्सचा प्रचंड तुडवडा आहे. ज्या पेशंटना श्वासोच्छ्वास करण्याचा त्रास आहे, पण व्हेंटीलेटरवर ठेवावे अशी गंभीर अवस्था नाही आहे अशांना ''ओव्हरव्हेल्म्ड" जीवनदान देत आहे.
'ओव्हरहेल्म्ड' हे नक्की काय आहे ते समजून घेऊ या.
कोवीडच्या लागण झालेल्या पेशंटची फुफ्फुसे दुर्बळ झालेली असतात. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन मास्क लावून मदत करण्यात येते. पेशंटची तब्येत फारच ढासळली असेल तर व्हेंटिलेटरची गरज भासते. बर्याच पेशंटना ऑक्सिजन मास्क पुरेसा नसतो, पण व्हेंटिलेटरचीही गरज नसते. अशा मध्यावस्थेत असलेल्या पेशंटना पुरेसा प्राणवायू पुरवण्याचे काम ''ओव्हरव्हेल्म्ड" करते.

