इकडे युध्दं फारच वाढली आहेत. चला,चंद्रावर जाऊन बोभाटा करूया!

लिस्टिकल
इकडे युध्दं फारच वाढली आहेत. चला,चंद्रावर जाऊन बोभाटा करूया!

अंतराळातला प्रवास बहुतेकांना हवाहवासा वाटणारा! अंतराळयानातून प्रवास करून पृथ्वीभोवती एक राउंड मारता यावा असे बर्‍याचजणांचे मनोमन स्वप्न असते. हे गर्लफ्रेंडला चंद्र तोडून आणेन सांगण्याइतके सोपे आहे, पण प्रत्यक्षात सध्यातरी अशक्यप्राय आहे!! 

आता एक मस्त बातमी! नासाने आणलेल्या एका भन्नाट आयडियाने तुम्ही गर्लफ्रेंडचे किंवा बॉयफ्रेंडचे नाव तरी निदान चंद्रावर पाठवू शकता.
चला ही भन्नाट आणि 'चकटफू' गिफ्ट कसे द्यायचे ते वाचूया!!

नासाकडून नेहमीच विविध अंतराळ मोहीमा सुरू असतात. कधी चंद्र, तर कधी मंगळ या ग्रहांवर ही संस्था तिथे मानवी वास्तव्याची शक्यता शोधत असते, तपासत असते. 
नासाची नवी चंद्रावरील मोहीम आहे Artemis-1. Artemis-1 स्पेस लॉन्च सिस्टीम रॉकेट आणि ओरियन अंतरिक्ष यानाचे पहिले विनाचालक उड्डाण परीक्षण असेल.  या यानात अर्थातच कोणीही माणूस नसेल, पण लोकांची नावे असतील. तुम्ही तुमचे नाव यात फ्लॅश ड्राइव्हने जोडू शकता आणि हे ते एका विशाल स्पेस रॉकेटच्या मदतीने ओरियन कॅप्सूलवर लॉन्च होईल.  
  या मोहिमेसाठी नासा लोकांकडून नावे मागवत आहे. लोकांकडून नावे पाठवली गेल्यावर ही नावे चंद्रावर लावण्यात येतील. सोप्या शब्दांत सांगायचे तर इथूनच चंद्रावर आपल्या नावाची पाटी लावण्याची ही संधी आहे.

 हे काही पहिल्यांदा होत आहे अशातला देखील भाग नाही. याआधी मंगळ मिशनसाठी १ कोटीहून अधिक नावे मंगळावर पाठविण्यात आलेली आहेत.

हे करायचे कसे असा प्रश्न पडला असेल?

हे करायचे कसे असा प्रश्न पडला असेल?

सोपं आहे. आता या बोर्डवर स्वतःचे नाव नोंदविण्यासाठी खाली दिलेली लिंक ओपन करा. तिथे तुमचे नाव आणि आडनाव टाका. सोबतीला पिनकोड विचारला असेल तोही टाकला की तुम्हाला बोर्डिंग पास मिळून जाईल. 

https://www.nasa.gov/send-your-name-with-artemis/

सध्या कसे आहे, युद्ध, कोरोना यांनी सर्वच कंटाळले आहेत. तिसऱ्या महायुद्धाचे सावट जगावर आले आहे. त्यापेक्षा आतापासून आपले नाव चंद्रावर पाठवून चंद्रावर बोभाटा करण्यासाठी तयार होऊया. काय म्हणता???


उदय पाटील