आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नसतं .
आपल्याला हवं तसं वळत नसतं.
नको नकोशा गोष्टी सहन कराव्या लागतात हे फक्त आपल्यापुरतं म्हणजे माणसांच्या आयुष्यातच असतं असं नाही. ते 'नकोसे' पण अगदी वनस्पतींना पण भोगावं लागतं .
आज ज्या फुलाची ओळख आम्ही करून देणार आहोत त्याला मराठीत जंगली बदाम म्हणतात.
राजस्थानच्या एका देवळात याच्या बिया भाजून प्रसाद म्हणून देताता.
पण या चांदणीच्या आकाराच्या लालगुलाबी मखमली फुलाला इंग्रजीत चक्क 'विष्ठेच्या देवतेचे फूल' म्हणतात.



