बाबा रामदेव यांच्या फिटनेसबद्द्ल आपण बोलायलायच नको.
योगा सोडून अनेक गोष्टीत त्यांनी आपला काटकपणा दाखवला आहे. त्यांच्या पतंजली ब्रँडबद्दल तर बोलायलाच नको. त्यांची दुकानं आणि ग्राहक, दोन्हीही दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. जवळ्जवळ त्यांनी भारतीय बाजारपेठ ताब्यात घेतली आहे असं म्हणायलाही हरकत नाही.

तर याच पतंजली ब्रँडच्या प्रमोशनसाठी रामदेव बाबा प्रो-कुस्ती लीग मध्ये गेले होते. तिथे चक्क त्यांनी ऑलिंपिक सिल्वर विजेता पहिलवान स्टेडिनिक ह्याच्याशी दोन हात केले आणि चक्क हा समाना 12-0 असा जिंकला. अर्थात हा सामना प्रदर्शनीय असल्यामुळं युक्रेनचा मल्ल जास्त प्रयत्न करताना दिसला नाही. पण तरीही बाबा रामदेव यांची कुस्ती खेळण्याची ही पहिली वेळ नाहीय. या आधी त्यांनी सुशीलकुमार सोबतही कुस्ती लढली होती.
