ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी समाधानकारक होत नसली तरी भारतीय हॉकी संघाने घडवलेला इतिहास देशवासियांना खुश करून गेला आहे. तब्बल ४९ वर्षांनंतर भारतीय संघाने ऑलिम्पिक सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
काही लोकांना या क्षणाचे लाइव्ह साक्षीदार होता आले. टीव्हीसमोर बसलेल्या लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. भारतीय पुरुष हॉकी संघाने इंग्लंडच्या संघाला ३-१ अशी धूळ चारल्यावर देशात आनंद होणे साहजिक असले तरी या निमित्ताने दोन लोकांच्या आनंदाचे मात्र विशेष कौतुक होत आहे. हे दोन लोक आहेत, सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडे.
