इंडीयन प्रीमियर लीग (Indian Premiere League) स्पर्धा ही क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम स्पर्धा का आहे,हे तुम्हाला सुरुवातीचे सामने पाहून कळलंच असेल. या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. आतापर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले आहेत. तर स्पर्धेतील ३० वा सामना सोमवारी (१८ एप्रिल) राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) यांच्या दरम्यान पार पडणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडणार आहे.
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत हे दोन्ही संघ २५ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सर्वाधिक १३ तर राजस्थान रॉयल्स संघाने ११ वेळेस बाजी मारली आहे. तर एक सामना रद्द करण्यात आला होता. तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने सहा पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, रासी व्हॅन डर ड्युसेन, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन
कोलकाता नाईट रायडर्स
श्रेयस अय्यर (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, ॲरॉन फिंच, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, अमन खान, उमेश यादव, पॅट कमिन्स.
या सामन्यासाठी अशी असू शकते ड्रीम ११ टीम
जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन
कर्णधार - जोस बटलर
उपकर्णधार - आंद्रे रसेल
