संपुर्ण जगात जर कुठला खेळ सर्वात जास्त प्रसिध्द असेल तर तो नक्कीच फुटबॉल आहे. जगातील कानाकोपऱ्यात फुटबॉलचे चाहते आहेत. जसं क्रिकेटमध्ये तुमचा आवडता खेळाडू कोण आहे? असं विचारलं तर, सचिन, विराट, धोनी किंवा विलियमसन अशी नाव ऐकायला मिळतात. तसेच फुटबॉलमध्ये तुमचा आवडता खेळाडू कोण? विचारल्यास एकच नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे लिओनेल मेस्सी. नाव घेण्याचं कारणही तितकच खास आहे. फुटबॉलमध्ये एकही असा विक्रम नसेल तो मेस्सीने आपल्या नावावर केला नसेल. (Lionel Messi)
२३ जून १९८७ रोजी जन्मलेल्या या खेळाडूचे अब्जावधी चाहते आहेत. तसेच मोठ मोठे फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक देखील त्याला आदर्श मानतात. यशाच्या शिखरावर असलेल्या या खेळाडूने काय कमवले आहे, हे संपूर्ण जगाने पाहिलं आहे. मात्र त्याचा संघर्ष खूप कमी लोकांना माहीत आहे. अनेकांना हे ही माहित नसेल की, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येणार होती
अर्जेंटीनातील सेंटा फेमध्ये जन्मलेल्या लिओनेल मेस्सीला लहानपणापासूनच फुटबॉल खेळण्याची खूप आवड होती. आपल्या चपळतेमुळे तो क्लब लेव्हलला फॉरवर्ड पोजिशनला खेळायचा. मात्र वय वर्ष १० असताना त्याला ग्रोथ हार्मोन डेफीशेंसी (Growth hormone deficiency) विकार झाला होता. या विकारामुळे, वयानुसार त्याच्या शरीराची वाढ न होण्याची भीती होती. वडिलांनी हेल्थ इन्शुरन्सच्या जोरावर दोन वर्ष त्याच्यावर उपचार केले. मात्र त्यानंतर मेस्सीचा उपचार करणे हे त्याच्या कुटुंबासाठी कठीण जात हो
मात्र तोपर्यंत मेस्सी फुटबॉलमध्ये वेगाने प्रगती करून पुढे जात होता. लोकल स्पर्धांमध्ये मेस्सी नावाचा दरारा होता. त्याचा खेळ पाहून अर्जेंटिनातील फुटबॉल क्लब रीवर प्लेटने त्याला आपल्या संघासाठी खेळण्याची ऑफर दिली होती. इतकेच नव्हे तर, उपचार करण्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती. मात्र क्लबकडे मेस्सीचा संपूर्ण उपचार करता येईल इतके पैसे नव्हते. ही गोष्ट बार्सिलोनाचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्ल्स रिहाच यांच्या कानावर पडली. मग काय, मेस्सीचा खेळ पाहून कार्ल्स देखील खुश झाले. त्यांनी मेस्सीचा डेव्हलपमेंट टीममध्ये समावेश केला आणि त्याचा उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र त्याला स्पेनला स्थलांतरीत होण्यासाठी सांगण्यात आले होते. मेस्सीच्या वडिलांना ही गोष्ट पटली
मेस्सीचा बार्सिलोना बी संघात समावेश करण्यात आला. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने जोरदार कामगिरी केली. त्यानंतर २००४ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्याने बार्सिलोना संघाकडून खेळताना आरसीडी इस्पेनोल संघाविरुद्ध पदार्पण केले. बार्सिलोनाने मेस्सीच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण दिलं. त्यानंतर मेस्सीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एका पाठोपाठ एक गोल आणि मोठ मोठे विक्रम करत त्याने फुटबॉल विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. गतवर्षी नियमांमुळे त्याला बार्सिलोना सोडून पीएसजीमध्ये जावं लागलं होतं. त्यावेळी मेस्सी आणि बार्सिलोना चाहते निराश झाले होते.
मेस्सीने आतापर्यंत ७ वेळेस बॅलिन डी ओर पुरस्कार पटकावला आहे. तसेच आज (२४ जून ) तो आपला ३५ वा वाढदिवस साजरा करतोय.
