जिम,स्विमिंग पूल अन् बरच काही! जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये काय काय सुविधा आहेत माहितेय का?

जिम,स्विमिंग पूल अन् बरच काही! जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये काय काय सुविधा आहेत माहितेय का?

नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमने अहमदाबादला नवीन ओळख निर्माण करून दिली आहे. साबरमती नदीच्या काठावर बांधलेले हे स्टेडियम हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. तब्बल ६३ एकरांवर पसरलेले हे स्टेडियम बनवण्यासाठी तब्बल ७०० कोटी पेक्षा ही अधिक खर्च करण्यात आला आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत रंगलेल्या सामन्यांमध्ये मोठ मोठे विक्रम केले गेले नाहीये. मात्र नरेंद्र मोदी स्टेडियम हे स्वतःच एका विश्वविक्रमापेक्षा कमी नाहीये. या स्टेडियममध्ये अशा काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या जगातील कुठल्याही स्टेडियममध्ये शोधूनही सापडणार नाहीत.

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे इतर स्टेडियमपेक्षा जर वेगळं आहे. या स्टेडियममध्ये ४ ड्रेसिंग रूम, २ जिम आणि वार्मअप करण्यासाठी वेगळी जागा आहे. सामना सुरू असताना पाऊस आला की, स्टेडियममध्ये पाणी भरतं, ज्यामुळे सामना सुरू करायला उशीर होतो. तसेच कधी कधी सामनाही रद्द करावा लागतो. मात्र या मैदानावरील ड्रेनिंग सिस्टम इतके पावरफुल आहे की, अर्ध्या तासात मैदान खेळण्यासाठी अनुकूल होऊ शकते. या स्टेडियममध्ये फ्लड लाईट्स ऐवजी एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आला आहे.

तसेच स्टेडियम जवळ ५५ खोल्या असलेला क्लब हाऊस, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, स्टीम आणि स्क्वॉश कोर्ट देखील आहे. अशा सुविधा जगातील कुठल्याही क्रिकेट स्टेडियममध्ये उपलब्ध नसतील. हेच कारण आहे की, हे स्टेडियम बनवण्यासाठी तब्बल ४ वर्षांचा कालावधी लागला.

या स्टेडियममध्ये खेळाडूंना सराव करण्यापासून ते मनोरंजन होईपर्यंत सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये चार संघांसाठी वेगवेगळे ड्रेसिंग रूम बनवण्यात आले आहे. तसेच स्टेडियममध्ये एक मोठे थिएटर देखील आहे. जिथे रिकाम्या वेळात खेळाडू चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

Inauguration of world’s largest cricket stadium in Ahmedabad is a historic day for the world of cricket and a proud moment for every Indian!

Equipped with world-class facilities, #NarendraModiStadium salute to the great leader @narendramodi #Cricket #Ahmedabad #bjp #BJYM pic.twitter.com/yjRrc5fRFQ

— Kartik harbola (@HarbolaKartik) February 24, 2021

 

 

नरेंद्र मोदी स्टेडियमवर अशी आहे भारतीय संघाची कामगिरी..

भारतीय संघाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार कामगिरी केली आहे. या मैदानावर भारतीय संघाने ७ सामने खेळले आहेत. यापैकी ५ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवण्यात यश आले आहे. भारतीय संघाने २०१२ मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. हा सामना भारतीय संघाने ११ धावांनी आपल्या नावावर केला होता. तर २०२१ मध्ये भारतीय संघाने इंग्लंड विरुध्द याच मैदानावर ५ टी -२० सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने तर २ सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने बाजी मारली होती. तर नुकताच न्यूझीलंड विरुध्द झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे.