भारत - पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग ११

भारत - पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग ११

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. आता आशिया चषक २०२२ स्पर्धेत हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना २८ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी आम्ही तुम्हाला भारत - पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असू शकते याबाबत माहिती देणार आहोत.

१)रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार):

रोहित शर्मा यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत देखील रोहित शर्माने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली होती. ही स्पर्धा भारतीय संघाला जिंकायची असेल तर रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात करून देणं गरजेचं आहे. 

२) केएल राहुल(kl rahul) (उपकर्णधार) :

केएल राहुल रोहित शर्मा सह डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. तो या स्पर्धेत उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. केएल राहुल सध्या भारतीय संघातील मुख्य फलंदाजांपैकी एक आहे. जर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सलामीला येत चांगली सुरुवात करून दिली तर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो.

३) विराट कोहली (Virat Kohli) : 

विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, तो डावाची सुरुवात करण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची जोडी चांगली कामगिरी करत असताना विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

४) सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) :

सूर्यकुमार यादव सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. तो पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तो आयसीसी टी -२० रँकिंगमध्ये बाबर आजम नंतर दुसऱ्या स्थानी आहे. तसेच झिम्बाब्वे संघाविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र आशिया चषक स्पर्धेत तो जोरदार पुनरागमन करताना दिसून येणार आहे.

५) रिषभ पंत (Rishabh pant) :

यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतला भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते. रिषभ पंतला देखील झिम्बाब्वे विरुध्द पार पडलेल्या वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. तो आगामी आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन करताना दिसून येणार आहे.

६) हार्दिक पंड्या (Hardik pandya) :

पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यात भारतीय संघातील दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. त्यामध्ये हार्दिक पंड्या हा पहिला अष्टपैलू खेळाडू असू शकतो. आयपीएल स्पर्धेपासूनच हा खेळाडू जोरदार कामगिरी करत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासह तो उत्तम नेतृत्व देखील करताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने आयर्लंड विरुध्द झालेल्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

७) रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) :

रवींद्र जडेजाला देखील पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यात संधी मिळू शकते. तो हार्दिक पंड्या नंतर संघात स्थान मिळवणारा दुसरा अष्टपैलू खेळाडू असू शकतो. गेल्या काही वर्षांपासून तो गोलंदाजी सह फलंदाजीमध्ये देखील भारतीय संघाला मोलाचे योगदान देत आहे.

८)भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar Kumar):

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर असणार आहे. तो नवीन चेंडूने पाकिस्तान संघातील टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडू शकतो.

९) आर अश्विन ( R Ashwin) : 

संघातील दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह अनुपस्थितीत आर अश्विनला देखील संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघ दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे आर अश्विनला देखील भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे.

१०) अर्शदीप सिंग (Arshdeep singh) :

युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला देखील पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते. भुवनेश्वर कुमार सोबत मिळून हा गोलंदाज पाकिस्तान संघातील फलंदाजांच्या अडचणीत वाढ करताना दिसून येऊ शकतो. 

११) युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) :

युजवेंद्र चहल हा पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या तिसऱ्या फिरकी गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. तो रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्यासह फिरकी गोलंदाजी करताना दिसेल.

अशी असू शकते प्लेइंग -११

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.