अभिमानास्पद बाब!! चकदाह एक्स्प्रेसने केली आतापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी

अभिमानास्पद बाब!! चकदाह एक्स्प्रेसने केली आतापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी

भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने वेस्ट इंडिज विरुध्द झालेल्या सामन्यात इतिहासाला गवसणी घातली आहे. तिने स्पर्धेतील १० व्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाची फलंदाज अनिसा मोहम्मदला बाद करताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ४० वा गडी बाद करताच ती स्पर्धेतील सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज ठरली आहे.

चकदाह एक्स्प्रेस या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या झुलन गोस्वामीने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिन फुलस्टनचा विक्रम मोडून काढला आहे. लिन फुलस्टनने १९८२ विश्वचषक स्पर्धेपासून ते १९८८ पर्यंत एकूण ३९ गडी बाद केले होते.

भारतीय संघाचा जोरदार विजय 

या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला. भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने १९९ चेंडूंमध्ये सर्वाधिक १२३ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने तिला चांगलीच साथ देत १०९ धावांची खेळी केली. यादरम्यान दोघांमध्ये १८४ धावांची विक्रमी भागीदारी झाली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटक अखेर ८ गडी बाद ३१७ धावा केल्या होत्या. 

या धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिज संघाकडून डिआंड्रा डॉटिनने ४६ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली. तर हेली मॅथ्यूजने महत्वाचे योगदान देत ४३ धावांची खेळी केली. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वेस्ट इंडिज संघाचा डाव ४०.३ षटकात अवघ्या १६२ धावांवर संपुष्टात आला. हा सामना भारतीय संघाने १५५ धावांच्या मोठ्या अंतराने आपल्या नावावर केला.