आता हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे. ट्रेकर्ससाठी पावसाळा म्हणजे तर पर्वणीच. पाऊस पडून गेल्यावर संपूर्ण सह्याद्री हिरवा शालू नेसतो व त्याच्या चाहत्यांना आकर्षित करतो. चिंब पावसात ट्रेक करायला सुद्धा खूप मजा येते. या वेळी अनेक अनुभवी लोक व नवीन लोक ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. परंतु यातल्या नवख्या मंडळींना ट्रेकिंग या विषयाबद्दल फारशी आत्मीयता नसते. परंतु इतर मित्र जातात म्हणून हे लोकसुद्धा त्यांच्याबरोबर ट्रेकिंगसाठी घराबाहेर पडतात. अशा वेळी ते ज्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणाबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. असो..!!!
या अशाच लोकांना आजचा हा लेख समर्पित आहे. हा लेख वाचून आपण एखादा दुर्ग पहायला, अनुभवायला जेव्हा जातो त्यावेळी आपण काय काय पूर्वतयारी करायला हवी यावर हा लेख प्रकाश टाकेल.




