शोएब अख्तरची भविष्यवाणी!! हे दोन संघ अंतिम सामन्यात येणार आमने - सामने...

शोएब अख्तरची भविष्यवाणी!! हे दोन संघ अंतिम सामन्यात येणार आमने - सामने...

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला होता. शेवटच्या चेंडूवर अश्विनने भारताला विजय विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असणार कारण,पहिल्याच सामन्यात भारताने जोरदार सुरुवात केली आहे. तर पाकिस्तान संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाहीये. या सामन्यानंतर अनेक दिग्गज मंडळींनी आपले मते मांडली आहे. दरम्यान पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अंतिम सामन्यात कोणते संघ प्रवेश करतील याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

शोएब अख्तरच्या मते, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम सामन्यात आमने सामने येऊ शकतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो. या स्पर्धेची सामन्यांची विभागणी २ गटांमध्ये करण्यात आली आहे. दोन्ही गटात प्रत्येकी ६-६ संघ आहेत. पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत.

या सहा संघांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी येणाऱ्या संघांना सेमी फायनलचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. तर या दोन्ही संघांचे सामने ग्रुप -२ मधील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या संघासोबत होतील. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघ थेट अंतिम सामन्यात आमने सामने येऊ शकतो. याबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, "भारताने विश्वचषक स्पर्धेत १ सामना जिंकला आहे. तर पाकिस्तान संघाने १ सामना गमावला आहे. आता आपण पुन्हा भेटू. आता पुन्हा भारतीय संघ समोर आला तर, आम्ही नक्कीच पराभूत करू..."

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला १६० धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील मुख्य फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने डाव सावरला आणि भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला. नाबाद ८२ धावांची तुफानी खेळी करणारा विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला.