२३ फेब्रुवारीला सुरू झालेला भारत - अॉस्ट्रेलीया यांच्यातला पहिला कसोटी सामना तिसर्या दिवशीच गुंडाळला गेला तो भारतीय संघाच्या दणदणीत पराभवामुळे. विराटच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या विजयी घौडदौडीला अखेर पराजयाचा लगाम लागला. तिसर्या दिवशीच सामना संपल्यामुळं हातात आणखी दोन दिवस रिकामे तर होतेच. सोबत पराभवामुळे टीमला इंडीयाला आलेलं नैराश्यही झटकायचं होतं. यासाठी कोच अनिल कुंबळेनी पुण्यातल्या दोन मित्रांच्या सहाय्यानं खास ताम्हिणी घाटात टीमसाठी ट्रेकिंगचा बेत आखला. ट्रेकींगचं ठिकाण होतं गरूड माची.






