एकेकाळी भविष्यातील सचिन तेंडुलकर म्हटला जाणारा आगरकर, कसा झाला पहिला अजित आगरकर वाचा..

एकेकाळी भविष्यातील सचिन तेंडुलकर म्हटला जाणारा आगरकर, कसा झाला पहिला अजित आगरकर वाचा..

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत. ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव,विराट कोहली,सुरेश रैना आणि शिखर धवन यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना या फलंदाजांचा स्ट्राइक रेट ९० ते १०० इतकाच असायचा. ही कामगिरी पाहता, तुम्हालाही असेच वाटले असेल की,या फलंदाजांपैकी एका फलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावले असेल. परंतु तुमचा अंदाज चुकीचा ठरेल. 

कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक एका फलंदाजाने नव्हे तर एका गोलंदाजाने झळकावले आहे. त्याला गोलंदाजाला भविष्यातील सचिन तेंडुलकर असे म्हटले जात होते. त्याची गोलंदाजी करण्याची ॲक्शन इतकी अप्रतिम होती की, तुम्ही ही एकदा तरी त्याच्या सारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाच असेल. तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून मुंबईचा अजित आगरकर आहे. अजित आगरकर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कित्येकदा शून्यावर बाद झाला, त्यानंतर त्याला बॉम्बे डक असे म्हटले जाऊ लागले होते. याच अजित आगरकरने २००० साली झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या २१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.

अजित आगरकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एक फलंदाज म्हणून केली होती. त्याने देखील प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. शिवाजी पार्कच्या मैदानावर, रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर घडला होता. त्याच मैदानावर अजित आगरकरने देखल क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. 

शिवाजी पार्कमध्ये सराव करत असताना, त्याने एक फलंदाज म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. असा फलंदाज ज्याला गोलंदाजी करता येत होती. त्याने १६ वर्षाखालील जाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्याने तिहेरी शतक झळकावले होते. हीच कामगिरी त्याने पुढे देखील सुरू ठेवली. १९ वर्षाखालील हॅरीस शिल्ड स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. ही कामगिरी पाहता त्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर असे म्हटले जाऊ लागले होते. परंतु भविष्यातील सचिन तेंडुलकर म्हणता म्हणता तो पहिला अजित आगरकर नक्कीच झाला.

क्रिकेटपटू होणं सोपी गोष्ट नसते. खेळाडूंच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येत असतात. असेच काहीसे अजित आगरकर सोबत देखील झाले होते. परंतु त्याने आपल्या कारकीर्दीत क्रिकेट चाहत्यांना अनेकदा जल्लोष साजरा करण्याची संधी दिली. ज्यामध्ये, २००३ टीव्हीएस चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने स्लोवर यॉर्कर चेंडू टाकून ॲडम गिलख्रिस्टला त्रिफळाचित केले होते. तसेच २००६ च्या वीबी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६ गडी बाद केले होते. हे असे काही क्षण आहेत, हे भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाही.

गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, अजित आगरकरने कधीही चाहत्यांना निराश केले नाही. २००२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर येऊन त्याने ९५ धावांची खेळी केली होती. तसेच लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावणे. असं सर्व असताना देखील त्याला दीर्घ काळ संघात टिकून राहण्याची संधी मिळाली नाही.