विजेंदर सिंगने नोंदवला 5 वा विजय

विजेंदर सिंगने नोंदवला 5 वा विजय

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने आपल्या 5व्या प्रोफेशनल बाऊटमध्ये फ्रान्सच्या रॉयर्सचा पराभव केला. परत एकदा टेक्निकल नॉकआउट प्रकाराने त्याने हा विजय मिळाला.

सहा राऊंडच्या या लढतीत पाचव्या राऊंडमध्ये जेव्हा विजेंदरचा हल्ला रॉयर परातवू शकला नाही तेव्हा रेफरीने सामना थांबवून विजेंदरला विजयी घोषित केले.