रजनीकांतचं नांव भारी, रजनीकांतचा सिनेमा भारी, रजनीकांतचं सगळंच लै भारी..
आतापर्यंत फक्त टॅक्सीज आणि बसगाड्यांवर जाहिराती करण्याची मजल गेलेल्या इंडस्ट्रीला मागे टाकून रजनीआण्णाच्या ’कबाली’ या सिनेमाची जाहिरात थेट विमानावरच करण्यात आलीय. एअर एशिया इंडिया असं या विमान कंपनीचं नांव आहे. एवढंच करून ही विमान कंपनी थांबली नाहीय, तर-
१. एअर एशिया इंडिया ही ’कबाली’ सिनेमाची ऑफिशिअल एअर पार्टनर आहे.
२. हे विमान रजनीकांतच्या फॅन्सना सिनेमाच्या पहिल्या शो साठी बंगळुरू ते चेन्नई घेऊन जाणार आहे. गरजूंनी अधिक माहिती आणि बुकिंग्जसाठी +91 80 41158492/8493 या नंबर्सवरती संपर्क साधावा.
३. एअर एशिया इंडियाने एक फेसबुक स्पर्धाही जाहिर केली असून जिंकणारास रिलीजचा शो पाहावयास मिळणार आहे आणि पुढील तीन विजेत्यांस सिनेमा जिथे जिथे शूट झाला, त्या लोकेशन्सची सफर घडणार आहे.
