अगदी काही दिवसांवर आपला स्वातंत्र्य दिन आला आहे. स्वातंत्र्य मिळवून आपल्याला या वर्षी ७० वर्ष पूर्ण होती. यानिमित्ताने देश भर कार्यक्रमाचं आयोजन सुरु असताना भारत सरकार तर्फे एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे ज्यात आपलं राष्ट्रगीत सांकेतिक भाषेत गाण्यात आलंय.
गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शन केलं असून बिग-बी अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या सोबत काही विकलांग व्यक्तींना आपण पाहू शकतो. हा व्हिडीओ रिलीज झाल्या पासून सर्व स्थरातून याचं कौतुक होत आहे. जे या सांकेतिक भाषेवर अवलंबून आहेत अश्या व्यक्तींना स्वातंत्र्य दिनी दिलेली ही भेट एक अमुल्य भेट आहे आहे असंच वाटतं !!




