उर्दूलेखक सआदत हसन मंटो हे नांव लेखकांच्या मांदियाळीत अत्यंत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथांचे विषय नेहमीच समकालीन लेखकांहून वेगळे होते. आजही त्यांच्या कथा वाचल्या तरी त्या तितक्याच टोकदार आणि वाचकाला अंतर्मुख करणार्या आहेत. त्यांची स्त्रीपात्रंही त्याकाळच्या साहित्याच्या मानाने बरीच बंडखोर आणि स्वतंत्र विचारांची होती. त्यांच्या निर्भीडपणामुळं आणि काही कथाविषयाच्या मांडणीवरून त्यांच्यावर खटलेही भरण्यात आले होते.
अर्थातच ते त्यांच्या कालकीर्दीत आणि नंतरही चर्चेत राहिले. त्यांच्या समग्र कथांचं संग्रहण फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. मंटोंच्या कथांपैकी कुठल्या कथा सर्वोत्तम म्हणून निवडायच्या हा प्रश्नच आहे. पाहा बरं, तुमची यातली आवडती कथा कोणती ते?
