तुम्ही आयफोनच्या बॅकपॅनलवर डिझाइन्ड इन कॅलिफोर्निया, असेम्बल्ड इन चायना असे लिहिलेले वाचले आहे का? आता काही दिवसांनी आपल्याला असेम्बल्ड इन इंडिया वाचायला मिळायची शक्यता आहे. आयफोनचे उत्पादन करणारी चायनीज कंपनी फॉक्सकोन ही भारतात आयफोन तयार करण्याचा प्लांट उभारणार आहे आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची निवड केली आहे.
फॉक्सकोनने गेल्यावर्षी महाराष्ट्र सरकारसोबत गुंतवणूकीचा करार केला होता. त्याशिवाय आयफोन बनविण्याच्या कारखान्यासाठी त्यांना 1200 एकर जागेची गरज आहे. या कंपनीने त्यासाठी तळेगाव चाकण आणि खालापूर या जागा शॉर्टलिस्ट केल्या आहेत.
आयफोनची निर्मिती सुरु होण्यास आणखीन बरीच वर्ष जावी लागतील. अर्थातच, निर्मिती महाराष्ट्रात जरी सुरु झाली तरीही आयफोनची किंमत कमी होईल असे वाटत नाही.
