२८ मे हा अहमदनगर म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याचा स्थापना दिन. या दिवशी जवळजवळ ५३० वर्षांपूर्वी, म्हणजेच १४९० साली अहमदनगरची स्थापना झाली. अहमदनगर आणि आसपासच्या भौगोलिक परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू बहामनी, निजामी अशा वेगवेगळ्या सत्तांची साक्ष आहेत.
चांदबीबी विजापुरची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतल्या साम्राज्यांची राज्यपालक राणी होती.
तसं तिला चांद सुलताना, चांद खातून अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.
चांदबीबीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केलं. मात्र तिला मुख्यत: अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखलं जातं.



