मराठीतल्या प्रसिद्ध डिटेक्टिव्ह मालिका- तुम्हाला कोणती अधिक आवडते, एक शून्य शून्य की हॅलो इन्स्पेक्टर?

लिस्टिकल
मराठीतल्या प्रसिद्ध डिटेक्टिव्ह मालिका- तुम्हाला कोणती अधिक आवडते, एक शून्य शून्य की हॅलो इन्स्पेक्टर?

डिटेक्टिव्ह कथा कुणाला आवडत नाहीत? हा तर सगळ्यात चवीने वाचला जाणारा साहित्यप्रकार. यावर मालिका बनल्या नसत्या तर नवलच. आज आम्ही घेऊन आलो आहोत मराठीतील आजवर झालेल्या डिटेक्टिव्ह मालिका. अर्थातच जुन्या दूरदर्शनवरच्या मालिकांचे धागेदोरे जवळजवळ उपलब्ध नाहीतच. तुम्हाला जर काही आठवत असेल, म्हणजे टायटल सॉंग वगैरे तर जरूर इथे भर घाला.

फास्टर फेणे -१९८३

फास्टर फेणे -१९८३

भा.रा. भागवतांचा हा बनेश फेणे बाळगोपाळांचा अत्यंत आवडता. आज दुदैवाने या मालिकेचं काहीच उपलब्ध नाहीय. ’फास्टर फेणे’ सुमीत राघवनला काही फोटो सापडल्याचं त्याने ट्विटरवर म्हटलं होतं. 

एक शून्य शून्य -१९८८

एक शून्य शून्य -१९८८

"एक.. शून्य.. शून्य.. वन.. झीरो.. झीरो.." अशी गंभीर आवाजातली घोषणा आणि मग तितक्यात गांभीर्याने गुन्ह्याची उकल करणारे शिवाजी साटम, दीपक शिर्के आणि अजय फणसेकर. शिवाजी साटम अजूनही CID मध्ये पोलिसाच्या भूमिकेत आहेत. 

हॅलो इन्स्पेक्टर-१९९०

हॅलो हॅलो हॅलो हॅलो इन्स्पेक्टर अशा गीतासोबतच गुंडांचा सामना करणारा रमेश भाटकर. एकेकाळी मालिकेचा एक भाग पाहण्यासाठी आठवडाभर वाट पाहायचो यावर आताच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. सोबतच्या व्हिडिओमध्ये तिचा टायटल ट्रॅक ऐकू शकता. 

रात्रंदिनी, संरक्षणी..
जागून जो, शोधी गुन्हा..
पोलिस हा ..
सुरक्षिततेसाठी जागरूक हा..
हॅलो हॅलो हॅलो हॅलो इंस्पेक्टर.........

परमवीर

परमवीर

नायक , खलनायक ते विनोदी अभिनेता अशा हरहुन्नरी कुलदीप पवारांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका. दुर्दैवाने तिचं नांव वगळता तिचे काहीच तपशील आंतरजालावर उपलब्ध नाहीत, अगदी प्रसारण वर्षसुद्धा. 

तिचं शीर्षकगीत मात्र बहुतेकांना आठवत असेलच- 

जो करे जीवाची होळी,  छातीवर झेलून गोळी,

अन्याय तुडविण्यासाठी, .......................

जो देशद्रोह नीत जाळी,  तो परमवीर....

कमांडर-१९९२

हॅलो इन्स्पेक्टर रमेश भाटकरांची ही आणखी एक मालिका..

तिसरा डोळा-१९९८

तिसरा डोळा-१९९८

तिसरा डोळा ही अगदीच बाळबोध मालिका होती. त्यात सुप्रिया कर्णिकांचा मदतनीसच सगळे तपास लावायचा आणि त्यांचं पात्र "हो, मलाही असंच वाटतंय" असं निर्बुद्धपणे म्हणायचं. 

लक्ष्य-२०११

लक्ष्य-२०११

आताचं माहिती नाही, पण स्टार प्रवाहवरची ही  लक्ष्य मालिका सुरू झाली तेव्हा चांगली होती. यांचं शीर्षक गीत (?) चालू असताना ’एक शून्य शून्य’ च्या ओपनिंग क्रेडिट्सची आठवण येते.

अस्मिता-२०१४

अस्मिता-२०१४

भारतीय डेलीसोपमध्ये बायकांना डिटेक्टिव्ह केले की त्याचं कसं कडबोळं होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही अस्मिता. आदर्श मुलगी, आदर्श सून, आदर्श शेजारीण, आदर्श पत्नी असला जगातल्या सगळ्या गोष्टींचा आदर्श सांभाळून राहिलेल्या वेळात बाई वकिली करून डिटेक्टिव्हगिरी करतात.