मंडळी आज आम्ही एका अशा फिल्मबद्दल बोलणार आहोत, जी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त आपटली.. पण जेव्हा टीव्हीवर आली तेव्हा तिने नुसता जाळ अन धूर संगटच केला. राव, ही फिल्म आहे ‘अंदाज अपना अपना’. सलमान आणि आमिरच्या करीअरच्या सुरुवातीच्या फ्लॉप सिनेमांमधली ही एक फिल्म. ‘दामिनी’ सारख्या हिट सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं. फिल्ममध्ये कॉमेडी नुसती ठासून भरली होती, पण त्याकाळात ती जास्त बिझनेस करू शकली नाही.
त्याकाळात जरी फ्लॉप असली, तरी आज ही फिल्म सुपरहिट आहे बॉस!! फिल्मची प्रसिद्धी एवढी वाढली आहे की त्यातील एक एक सीन डायलॉगसहित लोकांना पाठ आहेत. काही डायलॉग तर तुम्हालाही पाठ असतील.
चला तर मग... आज बघूयात ‘अंदाज अपना अपना’ फिल्म मधले काही अफलातून, माइंडब्लोईंग डायलॉग्ज...















