डार्क इज डिव्हाईन : देवी देवतांचं हे सावळं रूप एकदा जरूर पाहून घ्या !!

डार्क इज डिव्हाईन : देवी देवतांचं हे सावळं रूप एकदा जरूर पाहून घ्या !!

रामायण, महाभारत तसेच गणपती, हनुमान, कृष्ण, शिव शंकर अशा देवी देवतांवर अनेक चित्रपट आणि मालिका येऊन गेल्या. अजूनही येत आहेत आणि येत राहतील. पण काय राव, देवांना टीव्हीवर किंवा मोठ्या पडद्यावर दाखवताना तो गौरवर्णी आणि देखणा असाच का दाखवतात ?? देवाबरोबरच देवीच्या बाबतीतही. देवी नेहमी लावण्यवती आणि सौंदर्यवती अशीच दाखवली जाते. मालिका चित्रपटाचा प्रभाव बघता आपल्याला असे प्रश्न सहजासहजी पडत नाहीत, पण हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

तर मंडळी, आपल्याकडची वर्षानुवर्षे चालत आलेली सौंदर्याची व्याख्या बदलण्यासाठी फोटोग्राफर ‘नरेश नील’ आणि सुंदर भारद्वाज या दोघांनी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेचं नाव आहे ‘Dark Is Divine’. त्याने चक्क सावळ्या रंगाच्या कलाकारांना देवांच्या अवतारात उभं केलंय. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सीता, शिव, कृष्ण आणि मुरुगन अशा ७ देवांना तुम्ही नव्या रुपात पाहू शकता. हे फोटो देवांच्या दैवत्वाला कुठेही धक्का लावत नाहीत, तर त्यांना एका वेगळ्या रुपात आपल्या समोर आणतात.

दुर्गा

कृष्ण

 

शिव

 

बाल मुरुगन

 

 

सरस्वती

 

लक्ष्मी

 

सीता आणि लव कुश 

 

नरेश नीलने हे फोटो त्याच्या फेसबुक पेजवर पोस्ट केल्यानंतर त्यांना ४६०० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं आहे. काही लोकांनी तर त्यांच्या मंदिरात हे फोटो ठेवण्यापर्यंत आपली पसंती दर्शवली आहे.
एका मानसिकतेची चौकट मोडण्याचा हा एक वेगळा प्रयत्न आहे असं आपण म्हणू शकतो.

सर्व फोटो स्रोत