गुगलच्या जाहिराती नेहमीच इमोशनल करणार्या आणि हटके असतात. यापूर्वी भारत-पाकिस्तानमधल्या फाळणीमुळे ताटातूट झालेल्या मित्रांची जाहिरात असो किंवा क्रिकेट मॅचसाठी जर्सी पेंट केलेल्या मुलाची गुगल ऍप्सची जाहिरात असो. सर्वच जाहिराती लोकांनी खूप उचलून धरल्या आहेत.
गुगल इंडियाने काल १६जून रोजी आणखी एक नवीन जाहिरात सादर केलीय-सिनेमावेड्या बाबांची आणि बाबांच्या मनीच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करणार्या मुलाची. बाबांच्या भूमिकेत आहेत नंदू माधव आणि मुलाच्या भूमिकेत आहे आपला ’मसान’चा नायक-विकी कौशल. अभिनयात एकदम सॉलीड असणार्या दोघांनीही या जाहिरातीमध्ये धमाल उडवून दिलीय.
या जाहिरात लॉंच झाल्यापासून २१ तासांतच तिला १ लाख ३२ हजार ६० लोकांनी पाहिलंय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, "नंदू माधव ही गब्बर म्हणून खासाच शोभला असता".
