’आयुष्यावर बोलू काही’ची लोकांनी पारायणं केली आणि त्यातल्या दमलेल्या बाबाच्या कहाणीनं भल्याभल्यांचे डोळेही पाणावले. संदीप खरेंची गाणी ऐकली नाहीत असा रसिक महाराष्ट्रात सापडणं अवघड आहे. ’मित्राची गोष्ट’ या सिनेमातून संदीप खरेंनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलाच आहे. आता येतोय त्यांचा पुढचा सिनेमा- ’दमलेल्या बाबाची कहाणी’!
ट्रेलर पाहूनच ही काहीशी ’सात आत घरात’ छापाची ’डोंबिवली फास्ट’ , पण मुलीवर अत्यंत प्रेम करणार्या बाबाची कहाणी आहे हे लक्षात येतं. संदीप खरेंसोबतच आपले लाडके कवि सौमित्र म्हणजेच किशोर कदम, अस्ताद काळे यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. पाहूयात २४जूनला हा सिनेमा कसा आहे ते..




