यावर्षीचे 'ओशियन फोटोग्राफर ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी फोटो पाह्यलेत का?

लिस्टिकल
यावर्षीचे 'ओशियन फोटोग्राफर ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी फोटो पाह्यलेत का?

दरवर्षी ओशियन फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार घोषित होत असतो. समुद्राच्या आतील सौंदर्य प्रभावीपणे मांडणारे फोटोग्राफर या निमित्ताने गौरविले जात असतात. नैसर्गिक सौंदर्याचे कुतूहल असणाऱ्या लोकांना हे फोटो म्हणजे पर्वणीच असतात. या पुरस्काराचे आयोजन ओशनोग्राफिक पत्रिकांच्या माध्यमातून करण्यात येत असते.

यावेळी पहिला पुरस्कार आयमी जान यांना ग्लास फिशने वेढलेल्या समुद्रातील हिरव्या कासवाच्या फोटोसाठी देण्यात आला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील निंगालू कोरल रिफ येथे हा फोटो घेण्यात आला आहे.

या स्पर्धेत दुसरा क्रमांक हा हेनली स्पियर्स यांना मिळाला आहे. स्कॉटलँड येथील शेटलँड बेटांजवळ मासे पकडण्यासाठी समुद्रात फिरणाऱ्या समुद्री पक्षांचा फोटो त्यांनी काढला होता. तर तिसरा क्रमांक मॅटी स्मिथ यांना मिळाला आहे. एका छोट्या हॉक्सबिल कासवाचा फोटो जो आपल्या अंड्यातून पहिल्यांदा बाहेर पडून समुद्राच्या आत जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

यंग ओशियन फोटोग्राफरचा पुरस्कार हान्ना ले लियु यांना देण्यात आला आहे. भुकेले असलेले पक्षी फिरत असलेल्या आकाशाच्या खाली एक लहानसा कासव पाण्यातून डोके बाहेर काढत आहे असा तो फोटो आहे. हा फोटो ऑस्ट्रेलिया येथील हेरॉन बेटावर घेण्यात आला आहे.

तर फिमेल फिफ्टी फॅदम(समुद्राची खोली मोजण्याचे एकक) या पहिल्यांदा ठेवण्यात आलेल्या कॅटेगरीत रॅने कॅपोजोला यांना पुरस्कार मिळाला आहे. सुर्यास्तावेळी आराम करणाऱ्या ब्लॅकटीप रिफ शार्कचा फोटो त्यांनी काढला होता.

निसर्गाचे नवे रूप दाखवणारे हे सर्वच फोटो एक सुंदर अनुभूती देणारे आहेत.

उदय पाटिल