सुरुवातीला मनोरंजन आणि नंतर कमाईचे साधन म्हणून युट्युब उत्क्रांत होत गेलं. आता तर पूर्णवेळ करियर म्हणून देखील कित्येक लोक हे युट्युबवर व्हिडीओ पोस्ट करत असतात. युट्युबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची यादी नुकतीच फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आली. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या युट्युबरचे वय ऐकून कुणाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. युट्युबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा युट्युबर आहे, रेयॉन काजी!!!
रेयॉन काजीने १ जून २०१९ ते १ जून २०२० या एका वर्षात २२० कोटी रुपये कमाई काढली आहे. या पठ्ठ्याचं वय फक्त 9 वर्ष आहे. अवघ्या ९ वर्षांच्या वयात युट्युबवर व्हिडीओ बनवून तो अब्जाधीश झाला आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी तो सर्वाधीक कमाई करणारा युट्युबर ठरला आहे.

