नेदरलँड या देशात एक भन्नाट स्टार्टअप आहे. क्राऊडेड सिटीज नावाचं हे स्टार्टअप पर्यावरण रक्षणात मोलाची कामगिरी करत आहे आणि या कामात त्यांनी एक नामी युक्ती योजली आहे.
या लोकांनी चक्क कावळ्यांना एक काम शिकवलं आहे. हे कावळे जिथे कुठे सिगारेटची थोटके पडलेली दिसतील, तिथून उचलून आणतात. ही थोटके मग क्रोबार नावाच्या एका यंत्राच्या माध्यमातून नष्ट करण्यात येतात. या स्टार्टअपची संकल्पनाच अशी आहे की ते कावळ्यांना सिगारेटची थोटके ओळखून, त्यांना उचलण्याचे प्रशिक्षण देऊन, शहरातील चौक किंवा इतर ठिकाणी जिथे कुठे पडले असतील तिथून ते उचलून आणतील.






