अजय-अतुल झाले पुन्हा एकदा सैराट- ऐका जाऊंद्याना बाळासाहेबची सगळी गाणी इथेच

 अजय-अतुल झाले पुन्हा एकदा सैराट- ऐका जाऊंद्याना बाळासाहेबची सगळी गाणी इथेच

’सैराट’ सिनेमाला गेला होतात तेव्हा ’जाऊंद्याना बाळासाहेब’चा ट्रेलर नक्कीच पाहिला असेल. ’अजय-अतुल’चं म्युझिक वाजवा म्हणणारा गिरिश कुलकर्णी  मिनिटाभराच्या ट्रेलरमध्येसुद्धा झक्कपैकी भाव खाऊन गेला होता. 

आज झी स्टुडिओने ’जाऊंद्याना बाळासाहेब’चा ऑडिओ ज्यूकबॉक्स रिलीज केलाय. ही गाणीही सैराटच्या गाण्यांइतकीच झिंग आणणारी आहेत.  ’डॉल्बीवाल्या बोलाव तुझ्या डीजेला’  आणि ’ब्रिंग इट ऑन’ ही पुढच्या सणाला आसमंत दणाणून सोडतील यात वाद नाही.  सैराटमधल्या ’याड लागलं’ आणि ’आता गं बया का बावरलं’ या प्रयोगानंतर  ’जाऊंद्या...’ मध्ये ’मोना डार्लिंग’ हे जाझ पद्धतीचं गाणं मस्त जमून आलंय. झालंच तर अजय-अतुलची खासियत असलेला ’गोंधळ’पण आहे. ’वाट दिसू दे’ हे ही एका वेगळ्या पद्धतीचं गाणंही तुम्हाला नक्की आवडेल.

ट्रेलरवरून कोल्हापुरच्या मातीतला वाटणारा हा सिनेमा धमाल टाईमपास असेल यात वाद नाही.