पाकिस्तानपेक्षाही जास्त कमावते इंडियन ऑइल कंपनी

पाकिस्तानपेक्षाही जास्त कमावते इंडियन ऑइल कंपनी

भारताची सगळ्यात मोठी ऑइल कंपनी- ’इंडियन ऑइल’ची कमाई संपूर्ण पाकिस्तान देशापेक्षा जास्त असल्याचे एका सर्वेक्षणातुन पुढे आलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात इंडियन ऑइल कंपनीची कमाई 54.7 बिलियन अमेरिकन डॉलर होती तर पाकिस्तान ची कमाई 38.7 बिलियन अमेरिकन डॉलर होती. ग्लोबल जस्टीस नाऊ नावाच्या युके मधल्या एका संस्थेनं हा  सर्व्हे केला होता.

जगातल्या सगळ्यात मोठ्या १०कंपन्या जगातल्या अनेक देशांपेक्षा जास्त कमाई करतात. शेल, वॉलमार्ट, ऍपल या तीन कंपन्यांचे मिळून उत्पन्न जगातल्या १८०देशांपेक्षा जास्त आहे.