मुन्नाभाई एमबीबीएसमधला आपला लाडका सर्किट म्हणजे अर्शद वारसी सध्या काय करतोय? वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारा अर्शद सध्या जिममध्ये खूपच घाम गाळतोय. त्याने नुकताच स्वतःचा फोटो शेअर केला आणि ते बघून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचा नवा लूक चर्चेचा विषय ठरला आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेचा WWE रेसलर जॉन सीनाने अर्शद वारसीचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल अर्शदचा हा फोटो आता जॉन सीनापर्यंतही पोहोचल्याचे दिसत आहे. अर्शदला हे कळल्यावर त्याने जॉन सीना चे आभार मानले आहेत. आतापर्यंत या फोटोला १.५ लाख लाईक्स आले आहेत.
अर्शदचा ट्रान्सफॉर्मेशन फोटो व्हायरल झाल्याने अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याचे कौतुक केले आहे. आशिष चौधरी, रणवीर सिंगसह अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी यावर फार गंमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत. एकाने लिहिलेय, "भाई ने बोला अपलोड करने का, तो करने का.पागल है क्या?". "Indian John Cena" एकाने लिहिले आहे, "ए सर्किट, John Cena को एक जादू की झप्पी दे ना!", "सर्किट, जॉन सीनाने तुला कुस्तीसाठी चॅलेंज केले आहे." अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
wahh re circuit, ek Jadu ki jhappi to banta hai is baat pe!
— Vineet Sheikh Doshi (@chacha_in_dubai) September 19, 2021
अर्शद सध्या एका भूमिकेसाठी ही तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. हा लूक कोणत्या चित्रपटात किंवा वेबसिरीज साठी येतोय हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल. तुम्हाला सर्किटचा हा नवा लूक कसा वाटतोय?
शीतल दरंदळे
