रजनीकांतचा कबाली हा तामिळ सिनेमा आज रिलीज झालाय. सकाळी चार वाजताचा शो, चेन्नईसह दक्षिण भारतात अनेक कंपन्यांनी चक्क दिलेली सुट्टी अशा अनेक गोष्टींमुळे हा सिनेमा चर्चेत आहे. रजनीकांत हा भारतातला सर्वात मोठा सिनेस्टार आहे हे या सिनेमामुळे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
पण एक गंमत म्हणजे या सिनेमाचे एक सुपर मराठी कनेक्शन आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले नायक आणि नायिका दोघेही मराठी आहेत. मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असलेला रजनी हा तर साऊथ इंडियात देवच झाला आहे. तर मराठीसह हिंदी चित्रपटात ठसा उमटवणारी राधिका आपटे आपल्याला या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मंडळी, तुम्ही या सिनेमाचे तिकीट बुक केले का नाही?
