हे परदेशी लोक कधी काय करतील आणि कधी काय म्हणतील याचा काही नेम नाही मंडळी. त्यांचे काहीच खरे नाही, हेच खरे आहे. नुकतीच घडलेली एक घटना बघितली तर तुम्हीसुद्धा म्हणाल, "काय नमुने असतात राव हे लोक"!!
मंडळी, नुकतीच एका मलेशियन गायिकेला पोलिसांनी अटक केली. कारण काय होतं माहित आहे? तिने चक्क अस्वल पाळले होते हो. कुत्रा पाळणे, मांजरी पाळणे हे समजण्यासारखे आहे, पण अस्वल कोण पाळतं राव? कदाचित त्या बाईला 'आज कुछ तुफानी करते है' वाला किडा चावला असेल. मलेशियाच्या राष्ट्रीय उद्यान आणि प्राणी संवर्धन खात्याने तक्रार दिली आणि बाईला जेलची हवा खावी लागली. कोर्टात या गायिका बाईंनी दिलेली साक्ष ऐकून तुमचे पण डोळे विस्फारतील मंडळी!! बाई कोर्टात सांगते की "मला माहितच नव्हते की तो अस्वल आहे. मी तर त्याला कुत्रा समजत होते". तुम्ही म्हणाल, ही बाई थेट कोर्टाला मुर्खात काढत आहे. पण पुढे तिने अजून काय काय तारे तोडले ते आधी बघून तर घेऊ...


