किरण फाटक या संगीतकारास, भारतीय संगीत युनिव्हर्सल करायाचे आहे. त्यांनी परदेशी संगीत ऐकले. त्यातले बरेचसे शब्द त्यांना कळाले नाहीत. त्यावेळेस त्यांच्या मनात विचार आला जर आपण आपले भारतीय अभिजात संगीतच इंग्रजी मधून आणले तर? आणि सुरुवात झाली एका प्रवासाची. त्यांनी इंग्रजी कवितांचा अभ्यास केला आणि काही बंदिशी भाषांतरीत केल्या. आपल्याला सवय नसल्यामुळे थोडे विचित्र वाटतं खरं, पण हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे.
