'लागिरं झालं जी' च्या शितलीवर डागली मोदीजींनी तोफ!! आज्याला दिला मोलाचा सल्ला?

'लागिरं झालं जी' च्या शितलीवर डागली मोदीजींनी तोफ!! आज्याला दिला मोलाचा सल्ला?

लोकांनो, काल वेळ भेटला म्हणून सहज आपल्या मोदीजींनी "लागिरं झालं जी"चा एपिसोड बघितला. मग काय? "किती असतील मनमौजी, पण लाखात एक माझा फौजी" या शितलीच्या डायलॉगवर मोदीजी जाम भडकले ना राव! पाठकबाईंनी राणाला वेड लावलं, आता ही शितली आमच्या आज्याला खेळवतीया... असं म्हणत त्यांनी शितली आणि पाठकबाईंवर निशाना साधलाय. किरकोळ भांडणातून संसाराला काडी लागती, गोड गोड बोलून १७६० पोरी मागे येतील अशे खोचक सल्लेही मोदींकडून आज्याला मिळाले. 

अर्थात हा मजेशीर डब व्हिडीओ बनवलाय 'खास रे टिव्ही' या युट्यूब चॅनेलनं. अजून काय काय म्हणाले बरं मोदीजी? त्यांनी आज्याला आणखी कोणते उपदेशपर डोस पाजले? पाहा हा व्हिडीओ आणि हसा पोटभर...