कन्व्हर्टिबल, पीक अप, ओपन टॉप मारुती ८०० ची हि भन्नाट १० रूपं तुम्ही नक्कीच पाहिली नसणार

लिस्टिकल
कन्व्हर्टिबल, पीक अप, ओपन टॉप मारुती ८०० ची हि भन्नाट १० रूपं तुम्ही नक्कीच पाहिली नसणार

आज जे लोक अगदी आऊडी-मर्सिडिझही चालवत असले तरी त्यांची स्वकमाईची पहिली कार बरेचदा मारुती सुझुकी ८००च असते. या कारने एक काळ गाजवला आहे. सध्या या कारचे उत्पादन होत नसले तरी आजही ही कार लोकांच्या मनात स्थान टिकवून आहे. मारुती सुझुकी ८०० त बदल करून तयार करण्यात आलेल्या काही गाड्या आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या पाहून या कारबद्दलचे कुतूहल अजूनच वाढेल.

मारुती ८०० कन्व्हर्टिबल

मारुती ८०० कन्व्हर्टिबल

कन्व्हर्टिबल कार्स सहसा महाग असतात. तर आपली मारुती ८०० ही बजेट कारमध्ये मोडते. कन्व्हर्टिबल कार ओपन टॉपसारख्या पर्यायांमध्ये उपलब्ध असते. अशावेळी मारुती ८०० बदल करून थेट तिलाच कन्व्हर्टिबल कार करून टाकण्यात आले. ही केसरी आणि काळी २ सीटर गाडी बघितल्यावर कुणीही ही मारुती ८०० आहे असे म्हणणार नाही. या गाडीला ६ प्रोजेक्टर लॅम्प आणि फॉ एयर लुप्स लावण्यात आले आहेत. ही गाडी साईडने बघितल्याशिवाय मारुती ८०० आहे असे लक्षात येत नाही.

मारुती ८०० ओपन टॉप

मारुती ८०० ओपन टॉप

लोकांना उघड्या छप्परच्या कारचे मोठे आकर्षण असते. पण चक्क मारुती ८०० या रूपात दिसेल असा विचार कुणी केला नसेल. पण मुंबईतील एका पठ्ठ्याने ही गोष्टही करून दाखवली आहे. हिरव्या आणि गुलाबी रंगाची ही कार लोकांचे लक्ष वेधून घेत असते.

स्पोर्ट कन्व्हर्टिबल

स्पोर्ट कन्व्हर्टिबल

पिवळ्या रंगात बनवलेली ही कार बघून कोणीही ही मूळ मारुती ८०० होती हे ओळखू शकणार नाही. करन जौहरच्या सिनेमात ही कार सहज खपून जाईल. जेडीएम होंडा बीटपासून प्रेरणा घेऊन दिल्लीतील एका व्यक्तीने ही कार तयार केली आहे. साईड स्कर्टस, अलॉय व्हील, लगेज रॅक यामुळे ही गाडी उठून दिसते.

मॉन्स्टर ८००

मॉन्स्टर ८००

मारुती ८०० ला मॉंस्टर ८०० मध्ये बदलल्यावर ही गाडी पॉप गाण्यांमध्ये दिसणाऱ्या गाड्यांप्रमाणे दिसते. ही गाडी बघून कोणी कल्पना पण करू शकत नाही की ही गाडी मारुती८०० पासून बनवली आहे. यात राईड सस्पेंशन, उंच केबिन, मॅक्सिस मड टायर्स या गोष्टींमुळे उठावदारपणा आलेला आहे.

पिकअप ८००

पिकअप ८००

पिकअप गाड्या या सहसा वजन वाहून नेण्यासाठी वापरल्या जातात. तर आपली मारुती ठरली ४ लोकांना घेऊन जाणारी कार. पण हिच मारुती ८०० पण पिकअप रूपात दिसू शकते ही कल्पना कोणी केली नसेल. जर तुमचे मारुती ८००वर प्रेम आहे आणि तुम्हाला पिकअप गाडी पण हवी आहे अशा परिस्थितीत ही गाडी तुमच्यासाठीच आहे.

अजून एक पिकअप ८००

अजून एक पिकअप ८००

ही पिकअप पहिल्या पिकअपपेक्षा वेगळी आहे. ही मूळ मारुतीशी जुळते. कारण फक्त मागच्या दोन सीटस् काढून पिकअप गाडी बनविल्याने ही मूळ मारुती ८०० आहे हे समजते.

मारुती गोल्फ ८००

मारुती गोल्फ ८००

फॉक्सवोगन गोल्फ ही लोकांना आवडणारी गाडी आहे. मग मारुती ८०० लाच गोल्फ बनविले तर? हाच विचार करून गोल्फसारखीच हुबेहूब मारुती ८०० तयार करण्यात आली आहे. गोल हेडलाईट, गोल्फसारखी बोनटवरील जाळी या गोष्टी गोल्फचीच आठवण करून देतात.

मर्सिडीज बेंज ८००

मर्सिडीज बेंज ८००

मारुती ८०० ला थेट मर्सिडीज बेंझमध्ये बदलणारा पठ्ठ्या खरंच कहर असला पाहिजे. थेट मर्सिडीजचा लोगो लावूनच ही गाडी तयार केली गेली आहे. एका छोटयाशा कारला एवढ्या मोठ्या गाडीत बदलल्यावरही ही गाडी तितकीच उठावदार दिसते.

सिसर डुअर मारुती ८००

सिसर डुअर मारुती ८००

हॉलिवूड सिनेमांमध्ये दिसणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये दरवाजा उघडताना तो वरच्या बाजूला उघडतो. या गाड्यांचे साहजिक लोकांना आकर्षण असते. या प्रकारचे दरवाजेही मारुती ८०० पासून दूर राहू शकले नाहीत. हे दरवाजे बघून थेट लॅंबोर्गीनीची आठवण येईल.

ओरिजिनल ८००

ओरिजिनल ८००

मारुती पासून कितीही वेगळ्या गाड्या बनवल्या तरी मूळ मारुती ८०० मध्ये लोकांच्या भावना अडकल्या आहेत. या मूळ गाडीला मॉडर्न टच देऊन तिला अधिक आकर्षक बनविण्यात आले आहे.

मग, या कार्स पाहून तुम्हीही तुमच्या गाडीचं रुपडं बदलण्याचा विचार तर करत नाही आहात ना?

उदय पाटील