मानसी नाईक का म्हणतेय 'मी गुलाबी नोट दोन हजाराची' ?

मानसी नाईक का म्हणतेय  'मी गुलाबी नोट दोन हजाराची' ?

राव, सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद केल्या आणि त्या जागी आणली २ हजारची कडक - नवी कोरी - करकरीत गुलाबी नोट!! मंडळी आता नोट बंदी चांगली होती की वाईट हा प्रश्न जाऊद्या, पण या नवीन २ हजाराच्या नोटेनं मात्र आपल्याला थिरकायला लावणारं एक फक्कड गाणं मिळवून दिलंय....

आता तुम्ही विचाराल हे गाणं कोणतं? तर मंडळी आम्ही बोलतोय आगामी ‘प्रेमा’ या सिनेमातील ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ या गाण्याबद्दल. मानसी नाईक वर हे आयटम सॉंग चित्रित केलेलं असून गाण्याचे बोल आणि मानसी नाईकचे लचके झटके यांची भट्टी छान जमून आलेली आहे. काहीच दिवसांपूर्वी या गाण्याचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला.

या गाण्याला आपल्या आवाजाने रंगत आणलीये ‘ही पोळी साजूक तुपातली’ फेम गायिका ‘रेशमा सोनावणे’ हिने. या गाण्याचे गीतकार/संगीतकार ‘शेखर आनंदे’ यांचा हा पहिलाच सिनेमा.

चित्रपट कसा आहे हे तर तुम्ही जाऊन बघालच, पण त्या आधी या गाण्याची मजा घ्या ना राव. मानसी नाईकचे ठुमके बघून तुम्ही सुद्धा म्हणाल ‘नोट बंदी चांगलीच होती !!’ काही असो..  पण आता मानसी नाईकनं वाट बघणारा रिक्षावाला आणि तसली गाणी करायची सोडून इतर काही कामं जमतात का  पाहावं हे उत्तम!!

मंडळी, यावर्षीच्या गणपती विसर्जनात डीजेवाला हे  गाणं वाजवेल असं वाटतं का तुम्हांला?