आता ऋषी कपूरच्या नावे सार्वजनिक शौचालय!

आता ऋषी कपूरच्या नावे सार्वजनिक शौचालय!

ट्विटरवर आपले मत मांडुन नेहमी चर्चेत राहाणारा ऋषी कपूर या आठवड्यात नेहरू-गांधी परिवारावर  उखडलेला आहे. प्रत्येक महत्वाच्या जागेला गांधी परिवाराचेच नाव का? जर दिल्ली मधल्या रस्त्यांची नावे बदलली जाऊ शकतात तर सी लिंक सारख्या जागांचे नाव का नाही बदलायचे?

 

 

 

या त्याच्या गांधी परिवारावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून अलाहाबादच्या काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एका सार्वजनिक शौचालयास ऋषी कपूर चे नाव दिले आहे. निषेधाचा हा वेगळा मार्ग नक्कीच मजेदार आहे.