टीव्ही आणि नाटक यामध्ये बिझी असलेला प्रशांत दामले तब्बल 14 वर्षाने चित्रपटात येतोय. भरत गायकवाडने दिग्दर्शित केलेल्या आगामी भो. भो. या चित्रपटात त्याने एका इन्शुरन्स एजंटची भूमिका केलेली आहे.

या चित्रपटात मुंबईत राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू तिच्या कुत्र्यामुळे होतो. पोलीस या घटनेचा तपास चालू करतात. या तपासादरम्यान त्या महिलेच्या घरी प्रशांत दामलेला जावे लागते. त्याच्या या भेटीचा मृत्यूच्या तपासावर काय परिणाम होतो ते पाहण्यासाठी आपल्याला 22 एप्रिल पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
प्रशांत दामलेंशिवाय या चित्रपटात सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.




