टीम इंडियाचा ऑलराउंडर रविंद्र जडेजा हा आज लग्नाच्या बेडीत अडकला. सेलिब्रिटीच्या लग्नात काहीतरी वाद नाही उद्भवला तर कसे चालणार? तर आज त्याच्या लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसलेल्या जडेजापासून काही फुटांवर एका नातेवाईकाने आपला आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला.
या घटनेनंतर काही वेळातच घटनास्थळी पोलीस हजर झाले. या गोळीबारात कुणालाही इजा झाली नसली तरीही पोलिसांनी या प्रकाराची चौकशी चालू केली. लायसन्स असलेल्या बंदुकीचा वापर स्वरंक्षणाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी केल्यास भारतीय कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते.
कालानुरूप हा सगळा वाद सगळे विसरतील, तोवर आपण नवदाम्पत्यास शुभेच्छा देऊयात.





