रितेश पाठोपाठ आता प्रियांका चोप्राही काढणार मराठीत सिनेमा?

रितेश पाठोपाठ आता प्रियांका चोप्राही काढणार मराठीत सिनेमा?

बॉलीवूडची आघाडीची तारका प्रियांका चोप्रा आता हॉलीवूड गाजवत असली तरी लवकरच तिची निर्मिती असलेला एक मराठी चित्रपट येतोय. चित्रपटाचं नाव आहे - व्हेंटिलेटर.  प्रियांकाच्या  प्रॉडक्शन हाऊसचं नांव आहे- 'पर्पल पेबल पिक्चर्स प्रोडक्शन'. याच प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली येतोय ’व्हेंटिलेटर’. नुसती घोषणा नाही, तर  सिनेमाच्यापोस्टर सोबतच 'या रे या' आणि 'जय देवा' ही दोन गाणी प्रियांकाने आपल्या ट्विटर अकाउंट वरून नुकतीच लॉन्च केली. गणेशोत्सवाच्या दरम्यान आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करताना गौरवास्पद वाटत आहे" असे प्रियांकानं ट्विट केलंय. ⁠⁠⁠⁠ ती या सिनेमात काही गाणीसुद्धा गाणार आहे. 
                   

या पिक्चरचे दिग्दर्शक ’फेरारी की सवारी’ फेम राजेश मापुसकर आहेत. एवढंच नाही, तर  चित्रपटात चक्क ११६ मराठी कलाकार आहेत.  आता प्रियांका चोप्रा काही सामाजिक वगैरे सिनेमा काढायच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळं सिनेमात नेहमीचा घिसापिटा  फॅमिली-कॉमेडी-ड्रामा फॉर्म्युला आहे झालं. आज अंतू बर्वाचे मित्र असते,  तर त्यांनी "सिनेमा प्रदर्शित झाल्यावर निर्मात्या ’व्हेंटिलेटर’वर जाऊ नये म्हणजे मिळवली" असं म्हटलं असतं. नाही का?