मलिष्का का म्हणतेय, 'बीएमसी तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?'

मलिष्का का म्हणतेय, 'बीएमसी तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?'

व्हायरलच्या या जमान्यात काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही भौ. असाच एक व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता, ‘सोनू....तुला मायावर भरोसा नाय काय’??..  हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मिडीयावर पसरला आणि त्याचे अनेक व्हर्जन तयार झाले. त्यातलाच एक लेटेस्ट वर्जन खुद्द आर. जे. मलिष्काने तयार केला आहे आणि तो भन्नाट हिट होतोय हे सांगायला नकोच.

.


सोनू व्हिडीओला म्युझिकल टच देत तिने सोनू सॉंग तयार केलंय. या गाण्याची खासियत अशी की ती या गाण्याच्या आडून बीएमसीला हळूच चिमटे काढतेय. ट्रॅफिक जॅम, खड्डे, पावसाने बंद पडणारी ट्रेन या मुंबईकरांच्या समस्या ती व्हिडीओद्वारे मांडताना तिचं एक वाक्य येतं की ‘मुंबई तू माझ्याशी गोड बोल’. राव, एवढ्या समस्या असताना मुंबई गोड बोलेल का? कदाचित हेच तिला व्हिडीओद्वारे दाखवायचं असेल.


तुम्ही मूळ सोनूsss व्हिडीओ पहिला असेल तर  त्यात ज्या प्रकारे यमक जुळवून सोनूला आवाहन केलंय तसंच इथे अख्ख्या मुंबईला आवाहन करण्यात आलंय. मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?


हा व्हिडीओ मंगळवारी अपलोड झाल्यापासून अनेकांनी तो उचलून धरला, एवढाच काय राव, दोन सेलिब्रिटींनी तो शेअर सुद्धा केलाय.


मंडळी जवळजवळ सगळ्याच रेडीओ चॅनल्सने आपले स्वतःचे सोनू व्हर्जन बनवले आहेत. पण त्यातला हा जास्त गाजलाय. तो एवढा गाजलाय की मलिष्काच्या पाठी ‘कोरस’ मधले जे लोक आहेत त्यांना लग्नाच्या मागण्यादेखील येऊ लागल्या आहेत.

व्हायरल का जमाना हे बॉस !!!