हल्ली सोशल मिडीयावर अनेक उलट सुलट बातम्या फिरत असतात आणि या बातम्या बघून तरुण पिढी आपलं मत तयार करते. हे ‘अस्सच’ असतं या मताचा एक वर्ग हल्ली तयार झाला आहे आणि अशा लोकांच्या मताला कोणी विरोध केला की त्यांचा ‘इगो’ दुखावला जातो. कधीकधी अश्यावेळी वादाचं रुपांतर हाणामारीतही झालेलं दिसून येतं.
अशाच एका मतभेदाचं रुपांतर वादात होऊन, नवरा नवरीने ठरलेलं लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. झालं असं की , लग्नाची व्यवस्था कशी असेल यावर बोलणी करण्यासाठी मुलगा आणि मुलगी एका देवळात भेटले, त्यावेळी बोलता बोलता आर्थिक मंदीवर दोघांची गाडी घसरली. मुलीचं बोलणं असं पडलं की आर्थिक मंदीला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.. तर मुलाचं म्हणणं अगदी उलट होतं.
दोघांच्याही अगदी टोकाच्या बोलण्याने वाद वाढत गेला आणि शेवटी दोघांनी मिळून लग्न मोडलं. दोघांच्या या निर्णयाने त्यांच्या घरच्यांना जबर धक्का बसला. पण दोघांनीही लग्नाला साफ नकार दिला.
टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली असून दोघांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत. मुलगा उत्तर प्रदेशात व्यावसायिक आहे तर मुलगी सरकारी नोकरी करत असल्याचं या बातमीत सांगण्यात आलंय.
आणखी वाचा :
नवरदेवाचा नागीन डान्स बघून नवरीनं लग्न मोडलं...वाचा यामागचं कारण !!!
मुलाला गुटखा खाताना बघून मुलीने भर मंडपात मोडलं लग्न...वाचा पुढे काय झालं!!!




