बघा इरफान खानने रजनीकांतवर काय आरोप केलाय? रजनीचे फॅन असाल तर स्वतःच्या रिस्कवर पोस्ट वाचा !!!

बघा इरफान खानने रजनीकांतवर काय आरोप केलाय? रजनीचे फॅन असाल तर स्वतःच्या रिस्कवर पोस्ट वाचा !!!

काही दिवसांपूर्वी रजनीकांतच्या ‘कबाली’ सिनेमाचा एक पोस्टर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. दिसायला अगदी हुबेहूब इरफान खानच्या मदारीची कॉपी वाटत होता. पोस्टरमध्ये मुख्य पात्राचा चेहरा दिसतोय आणि एका शहराचं चित्र आडवं बसवण्यात आलंय. फरक एवढाच की इरफानच्या पोस्टरमध्ये मुंबई आहे आणि रजनीकांतच्या पोस्टरमध्ये मलेशिया.

इरफानच्या मते ‘रजनीकांतच्या सिनेमाने आमच्या सिनेमाचं पोस्टर कॉपी केलं आहे’. हा सरळ सरळ साक्षात रजनीकांतवर गंभीर आरोप आहे. पण असो... या व्हायरल पोस्टरमुळे बरीच खळबळ माजली होती. पण गंमत अशी की हे पोस्टर कबाली सिनेमाचं अधिकृत पोस्टर नसून ते रजनीकांतच्या एका फॅनने तयार केलेलं पोस्टर आहे. या पोस्टरमागे मदारी सिनेमाचीच प्रेरणा असावी असे दिसते.

पोस्टर चोरी करणे तर काहीच नाही हो, भारतात आख्खीच्या आख्खी फिल्म चोरी करणारे देखील आहेत असंसुद्धा ऐकण्यात आलंय....

वाचा :
राधिका आपटे आणि मनोज वाजपेयी यांचा थ्रिलर पाहिलात? शिरीष कुंदरने म्हणे कथा चोरलीय...