वॉट्सअपवर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. असाच एक विडीओ सध्या गाजतोय. ज्यात एक मद्यधुंद तरुणी पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करत आहे. ही घटना आहे १५ जूनची. पोद्दार रुग्णालयासमोर रात्री दारू पिऊन गाडी चालवत असताना तरुणीची कार दुभाजकाला जाऊन आदळली. घटनास्थळी पोलीस पोहोचले असता कार मधील सर्वजण दारूच्या नशेत आढळले. पोलिसांनी कारमधल्या तिन्हीजणांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं असता चौकशी दरम्यान मुलीने धिंगाणा घालायला सुरुवात केली. यात तिने पोलिसांना शिव्या, मारहाण तसेच काही पोलिसांना चावा घेतल्याच स्पष्ट होत आहे. एवढं होऊनही तिला 15000 रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आल्याचीही बातमी कळते.
दारू पिऊन गाडी चालवू नका असे अनेकदा सांगूनही सारे नियम धाब्यावर बसवण्यात येत आहे हे यातून सिद्ध होते.
पण यातूनही काय साध्य होणार? हिने दारू पिऊन फक्त धिंगाणा घातलाय. जाह्नवी गडकरने दारू पिऊन माणसं मारली तरी कोर्टाने तिचं काय वाकडं केलं? काही दिवस कोठडीत ठेऊन घेतलं आणि काही दिवसांनी तिचं ड्रायविंग लायसंससुध्दा परत देऊन टाकलं.
सावध राहा, बिईंग ह्युमनचा वारसा पुढे चालवला जातोय..
