साराभाई व्हर्सेस साराभाई पुन्हा टीव्हीवर? निर्मात्याने केले ट्विट

साराभाई व्हर्सेस साराभाई पुन्हा टीव्हीवर? निर्मात्याने केले ट्विट

 मिडलक्लास मोनिशा, हाय सोसायटीमधली दांभिक माया, विचित्र आणि तितक्याच मजेदार कविता करणारा रोसेश, घरातले नारदमुनी इंद्रवदन आणि या सगळ्यांकडून छळला जाणारा डॉ. साहिल साराभाई. 

हे साराभाई कुटुंब २००५मध्ये आपलं सर्वांचं लाडकं बनलं होतं. खाष्ट सासवा, रडव्या सुना आणि चालबाज साजिशवाल्या जाऊबाई या लोकांचं उदंड पीक आलं असताना ही मालिका म्हणजे सुखद गारवा होती. पहिल्या सीझनच्या शेवटी दुसरा सीझन येणार अशी त्यांनी तेव्हाच घोषणा केली होती पण इतक्या वर्षांत तो योग काही आला नाही. मालिकेतला दुष्यंत म्हणजेच देवेन भोजानीने दोन वर्षांपूर्वी ’साराभाई’ परत येणार नाही असं म्हटलं होतं. पण  साराभाई मालिकेचा  निर्माता जमनादास माजेठियांनी ट्विटरवर कालच एक पोस्ट टाकली आहे.

साराभाई परिवार ’तेरे मेरे सपने’ गाताना-

 साराभाई व्हर्सेस साराभाईचं टायटल सॉंग गाताना सगळे साराभाईज, सोबत आहे जेडी मजेठिया आणि आतिश कपाडिया उर्फ ’कच्चा केला’.

साराभाईच्या सर्व कलाकारांचं सतीश शहांच्या घरी एक गेट-टुगेदर झालं आणि त्या फोटोसोबतच ’आता साराभाईंच्या फॅन्सना गुडन्यूज मिळेल’ अशा आशयाच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा साराभाई पाहायला मिळणार असं दिसतंय. चला, आता पुन्हा एकदा रोसेशच्या कवितांसाठी, मायाच्या टोमण्यांसाठी आणि मोनिशाच्या वेडगळपणासाठी तयार होऊयात.