“एच.ए.एल. तेजस” हे लढाऊ विमान भारतीय वायुदलात आज सामील करून घेण्यात येणार आहे. बंगळुरू येथे हा सोहळा पार पडणार असून यावर्षी अशी ६ तेजस विमाने वायुदलात सामील करून घेण्यात येतील. त्यापैकी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) तर्फे आज २ विमाने वायुदलात दाखल होत आहेत.
वायुसेना ‘फ्लाईंग डॅगर्स ४५’ या नावाने पहिली स्क्वाड्रन तयार करणार आहे. एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांड इन चीफ एअर मार्शल ‘जसबीर वालिया’ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्क्वाड्रन मध्ये SP-1 आणि SP-2 हे तेजसचे पहिले २ वर्जन सामील होतील. ‘एम रंगाचारी’ हे फ्लाईंग डॅगर्स स्क्वाड्रनचे पहिले कमांडिंग अधिकारी असतील.
“एच.ए.एल. तेजस” संपूर्ण स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे तर वजनाला हलके असल्यामुळे याचा भारतीय वायुदाला नक्कीच फायदा होणार आहे.
