शार्क टॅंक अमेरिकेची क्रेझ भारतातही पोचली आणि शार्क टॅंक इंडिया या शोने अनेक लोकांना टीव्हीसमोर ओढले. कोरोनानंतर नोकऱ्यांची असलेली असुरक्षितता आणि जगसहित देशभर वाढत असलेले स्टार्टअप कल्चर यामुळे देशभरातील यशस्वी स्टार्टअप संस्थापकांच्या देखरेखीखाली सुरू झालेला हा शो तुफान चालला.
एकतर या शोमध्ये अनेक स्टार्टअप्स इन्व्हेस्टमेंटच्या ऑफर्स घेऊन येत असल्याने लोकांना अनेक स्टार्टअपची ओळख झाली. या कंपन्या वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित बिझनेस मॉडेल कसे तयार करतात, एकंदरीत कागदावरची योजना ते प्रत्यक्षात हातात सांगण्यासारखा नफा येईपर्यंत कसे काम करतात हे सर्व यातून लोकांना कळाले. तसेच या स्टार्टअप्सचे शार्कनी केलेल्या विश्लेषणामुळे भविष्याच्या दृष्टीने लोकांच्या अभ्यासात भर पडत होती म्हणून सर्व बाजूने हा शो लोकांसाठी महत्वाचा होता.



