अमेरिकन वेळेप्रमाणे ९ तारखेच्या रात्री आणि भारतीय वेळेप्रमाणे १० तारखेला पहाटे ६:३०वाजता ऑस्कर पुरस्कार जाहीर होणार आहेत. आजवर तुम्ही सोमवारी सकाळी लवकर उठून ७:३० वाजता गेम ऑफ थ्रोन्स पाह्यलं असेलच, आता ऑस्कर पुरस्कार सोहळाही पाहालच, हो ना?
तर, २०१९ सालात सिनेजगताच्या इतिहासात महत्त्वाच्या म्हणता येतील अशा अनेक फिल्म्स प्रदर्शित झाल्या. रॉबर्ट डी नीरो, अल पचिनो आणि जो पेस्सी या तीन दिग्गज अभिनेत्यांचा 'आयरिशमन', जोकरची जन्मकथा सांगणारा ‘जोकर’, दिग्दर्शनाचा अप्रतिम नमुना असलेला ‘१९१७’ आणि जागतिक सिनेमात सध्या गाजत असलेला ‘पॅरासाइट’ सिनेमा २०१९ गाजवणारे ठरले.
आजच्या लेखात आपण ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत स्थान मिळालेल्या ९ चित्रपटांची ओळख करून घेणार आहोत.
